लातूर: मांजरा साखर परिवाराने १० साखर कारखान्यांकडून गाळपात भरारी घेतल्याने जनावरी २४ पर्यंत ३० लाख ६८ हजार ९३७ मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे. मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी म्हणाले की, राज्यात मांजरा साखर परिवाराने गाळपात भरारी घेतली आहे. चालू गाळप हंगामात २३ जानेवारीपर्यंत मांजरा साखर कारखान्याने ३ लाख ७१ हजार ८७० मेट्रिक टन गाळप केले आहे.
निवळीयेथील विकास सहकारी साखर कारखान्याने ३ लाख ६५ हजार ४०० टन, तोंडार येथील विलास साखर कारखान्याने २ लाख ९१ हजार ३० टन, निवाडा येथील रेणा साखर कारखान्याने ३ लाख ९ हजार ७९०, तळेगावच्या जागृती शुगरने ३ लाख ६९ हजार ८१०, मळवटीच्या ट्वेण्टीवन शुगरने ३,२६,७२६, सोनपेठ येथील ट्वेंटीवन शुगरने ५,०२,५८०, लोहा येथील ट्वेंटीवन शुगरने १,४२,४८६, बेलकुंडाच्या मारुती महाराज साखर कारखान्याने १ लाख २२ हजार २४५ तर मंगरूळच्या मांजरा शुगर या कारखान्याने २ लाख ६६ हजार ८३० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.
लेख वाचण्यासाठी क्लिक करा - मांजरा साखर परिवाराकडून २९ लाख ४५ हजार क्विंटल साखर उत्पादन : माजी मंत्री दिलीपराव देशमुख
.jpeg)
0 Comments